बोरिवलीहून मुलुंडला फक्त एका तासात, 900 मीटर लांब सिमेंट-काँक्रीटचा पूल बांधणार

मालाड पश्चिम येथील मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स यादरम्यान पाaिलका 900 मीटर लांबीचा नवीन पूल बांधणार आहे. हा पूल गोरेगाव -मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. यादरम्यानचा सर्व्हिस रोडही सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. या पुलामुळे बोरिवली ते मुलुंड हा प्रवास अवघ्या एका तासात करता येणार आहे. या कामासाठी पालिका 180 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत वाढणारी वाहतूककाsंडी पह्डण्यासाठी पालिका मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱया अप्पापाडापर्यंत 18.30 मीटर डीपी रोड फेज वनचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी डिझाईन, बिल्ट, काँक्रीट पूल, स्टील ब्रिज, टनेल ब्रिज व सिमेंट-काँक्रीट क@वरेझचे बांधकाम तसेच 36.60 डीपी रोडच्या कामासाठी अहवालाची समीक्षा, प्रोजेक्ट रिपोर्ट, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता ऑडिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड जाण्यासाठी जीएमएलआर बांधला जात आहे.