93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

1195

धाराशिव येथे 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या 30 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपास्थिती होती. धाराशिव हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. येथे होत असलेले ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करु या, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी यावेळी दिली.

93-marath

पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे म्हणाल्या, धाराशिव येथे होणारे संमेलन हे सर्वार्थाने वेगळे अरणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना लाभणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन संयोजक समितीने करावे. आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या