
ताम्हिणी घाटातील दरीत गाडी कोसळल्याने पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांत अशा पद्धतीने तब्बल ९५ अपघात घडल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातांमध्ये ३५ जणांचा मृत्यू तर १७५ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग धोक्याच्या वळणावर असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
ताम्हिणी घाटमार्गावरील रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे असून ते तीव्र उताराचे व तीव्र चढावाचे आहेत. या मार्गावर संरक्षक कठड्यांचा, मार्ग दिशा फलकांचा अभाव आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. पुण्याहून दिवेआगरकडे निघालेल्या सहा तरुणांच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
ताम्हिणी घाटात सणसवाडीजवळ एका तीव्र वळणावर त्यांची गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट ५०० फूट दरीत जाऊन कोसळली. दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली. तोवर अपघाताची कल्पना कोणालाच आली नव्हती. अपघातग्रस्त ठिकाणी संरक्षक कठडे यापूर्वीच तुटले होते. दिशादर्शक फलकही नव्हते, त्यामुळे ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त ठिकाणी संरक्षक कठडे असते तर कदाचित या तरुणांचा जीव वाचला असता असे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
ताम्हिणी अपघात मृत्यू जखमी
घाट
२०२३ २१ ६ ३०
२०२४ ३९ १८ १०१
२०२५ ३५ १५ ४४
दुर्घटनांवर दृष्टिक्षेप ३१ ऑक्टोबर २०२५ ला
एका कारवर दरड कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. ५ मार्च २०२५ रोजी महिन्यात एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या आधी लग्नाचे क्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला होता. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

























































