माथेरानच्या राणीला पारदर्शक ‘विस्टाडोम’ डब्याची जोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माथेरानच्या हिरवाईचे आणि तिथल्या लाल मातीचे पर्यटकांना प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे पर्यटक ऐन हंगामात प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादाने तिकिटे न मिळाल्याने प्रवाशांचा नेहमी हिरमोड होत असतो. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे हे थंड हवेचे ठिकाण आता पारदर्शक काचेच्या ‘विस्टाडोम’ कोचमधून पर्यटकांना न्याहाळता येऊन खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद घेता येणार आहे.

रेल्वे बोर्डाचे सदस्य रवींद्र गुप्ता यांनी रविवारी माथेरानमधील सेवेचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत यावेळी मध्य रेल्वेचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक संजयकुमार पंकज, मध्य-पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य मेकॅनिकल इंजिनीअर यांच्यासह अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक  विद्याधर मालेगावकर उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांनी माथेरानच्या मिनी ट्रेनमधील पर्यटक प्रकाशांशी संवाद साधला. यातील काही प्रवाशांनी सध्या जनशताब्दीला जोडलेल्या पारदर्शक ‘विस्टाडोम’ डब्यांप्रमाणे कोच असावा अशी मागणी केली. त्यानुसार पारदर्शक कोच तयार करण्याविषयी योग्य ते पाऊल उचलण्याचा निर्णय गोयल यांनी घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा डबा लककरच तयार करून तो सेकेत जोडला जाणार आहे.

कसा असतो ‘विस्टाडोम’ कोच
परदेशांमध्ये ‘विस्टाडोम’ कोचची संकल्पना लोकप्रिय आहे. आपल्याकडे रेल्वेत सर्वप्रथम विशाखापट्टणम येथे ‘विस्टाडोम’ कोचचा कापर होत आहे. त्यानंतर कोकणात धावणाऱया जनशताब्दी एक्प्रेसमध्येही त्याच पद्धतीने पारदर्शक कोच जोडण्यात आला. या कोचचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे छत पारदर्शक असून त्यामुळे पर्यटकांना ३६० अंशांमध्ये निसर्गाचा आनंद लुटता येतो.