ठाण्याच्या ‘मनी ट्रेड क्वॉइन’वर छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

आमच्याकडे पैसे गुंतवा.. सहा महिन्यांत वीसपट पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून हजारो जणांची फसवणूक करणाऱया फ्लिन्ट स्टोन ग्रुपच्या घोडबंदर रोडवरील कार्यालयावर पोलिसांनी छापे मारले. मनी ट्रेड क्वॉइनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून ठाणे क्राइम ब्रँचने तीन-चार जणांना अटक केली आहे. तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेतली असून या घोटाळ्यात अनेक बडय़ा हस्तींचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे.