
सामना ऑनलाईन । मुंबई
रिलायन्स कॅपिटलमधून बोलतोय असे खोटे सांगून शेकडो लोकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गेल्या आठवडय़ात दिल्लीच्या पाच तरुणांना अटक केली. ते तरुण इंडिया इन्फोलाईन लिमिटेड कंपनीत कामाला होते. ती कंपनी बंद पडल्यानंतर या तरुणांनी स्वतःचे कॉल सेंटर सुरू करून लोकांना स्वस्तात लोन, जास्त व्याजदरात एफडी, गुंतवणूक असे आमिष दाखवून लुटले होते. पाचपैकी एक सर्वांवर देखरेख ठेवायचा तर दुसरा केवळ बँक अकाऊंटची व्यवस्था करायचा. तर तिसऱ्याला सीम कार्डच्या कंपनीकडून रॅन्डम डेटा विकत आणून देण्याचे काम हेते. अशा प्रकारे त्या पाच जणांनी काम वाटून घेतले होते आणि शेकडो लोकांना चुना लावला होता. ते पाच जण सीम कार्ड कुठून खरेदी करायचे याचा माटुंगा पोलीस शोध घेत आहेत.


























































