
प्रसाद नायगांवकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे कोरड्या पडलेल्या धावंडा नदीला पूर आला. शुक्रवारी म्हणजेच २२ जूनच्या रात्री दिग्रस परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला. यामुळे कोरडी पडलेली धावंडा नदी दुथडी भरून वाहायला लागली. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी दिग्रसकरांनी नदीचच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. गेले १५ दिवस यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे.




























































