
सामना प्रतिनिधी । मालवण
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेच्या वर्गणीदार सभासदांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा रेवंडी गावचे नागरिक अविनाश हडकर यांनी पुरस्कृत केली आहे.
“रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराने मला काय दिले?” हा विषय स्पर्धेसाठी असून शब्द मर्यादा एक हजार शब्द एवढी आहे. प्रथम पारितोषिक ७०१रू, द्वितीय ६०१रू, तृतीय ५०१रू, चतुर्थ ४०१रू, पाचवा ३०१रू तर उत्तेजनार्थ प्रत्येकी२००रू पाच बक्षिसे असून स्पर्धकांनी ३०जुलै पर्यंत संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत निबंध जमा करावेत. अधिक माहिती साठी ग्रंथपाल विनिता कांबळी (०२३६५२४६०१७ ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




























































