
सामना ऑनलाईन । खेडा
व्हायब्रंट गुजरातचा गाजावाजा करणाऱ्या आणि गुजरातच्या विकासाचे गोडवे गाणाऱ्यांनी किती खोटे चित्र उभे केले आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये खेडा जिल्ह्यातील एका गावातल्या विद्यार्थ्यांना पूल तुटल्याने शाळेत जाण्यासाठी कशी कसरत करावी लागते आहे ते दिसते आहे. या व्हिडीओमुळे गुजरातच्या विकास मॉडेलचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
#WATCH: School children crossing a bridge between Naika & Bherai village of Kheda district. The bridge broke down 2 months ago. #Gujarat pic.twitter.com/7ToM5W783I
— ANI (@ANI) July 11, 2018
खेडा जिल्ह्यातील नैका आणि भेराई गावातील पूल दोन महिन्यांपूर्वीच तुटला आहे. या गावातील गावकऱ्यांनी या संदर्भात तक्रार देखील केली आहे. असे असताना देखील त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रावकऱ्यांना तुटलेल्या पुलावरू कसाबसा प्रवास करावा लागतो. मात्र महिनाभरा पूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्थिती अधिक गंभीर बनली आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना रोज अशाच प्रकारे पूल पार करावा लागतो.




























































