Wimbledon 2018 : सेरेना विल्यम्स फायनलमध्ये, कर्बरशी होणार सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

विम्बल्डन २०१८ मधील महिला एकेरीच्या फायनलचा सामना सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक कर्बर यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेरेना विल्यम्सने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जसचा ६-२ आणि ६-४ अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. या विजयासह सेरेनाने दहाव्यांना विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

जर्मन खेळा़डू कर्बरशी होणार सामना
जर्मन खेळाडू अँजेलिक कर्बरने उपांत्यफेरीच्या सामन्याच माजी फ्रेंच विजेती येलेना ओस्तापेन्को हिचा ६-३ आणि ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत फायनल गाठली. फायनलमध्ये तिची गाठ सेरेना विल्यम्सशी पडणार आहे. कर्बर हिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळे या दोघींमधील सामना चांगलाच रंगणार आहे.