कुडाळमध्ये कार व मोटरसायकलच्या अपघात तरुण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

मुंबई – गोवा महामार्गावर श्रीरामवाडी येथे लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपाजवळ वॅगन आर कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार सलीम सादीक सय्यद ( ३०) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता झाला.
सावंतवाडीकडून कणकवलीच्या दिशेने वॅगन आर कार जात होती. त्याचवेळी कुडाळ राज हॉटेल जवळून उद्यमनगरच्या दिशेने सलीम सय्यद मोटरसायकलवर जात होता. त्याचवेळी मोटरसायकलने वॅगन आर कारला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल उंच उडून महामार्गावर पडली. यात सय्यद याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.