
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
‘आषाढी’पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका जाहीर करावी अन्यथा श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांची आज पंढरपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.



























































