
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कुलगाममधून अपहरण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह कैमोह गठ येथे आढळला आहे. मोहम्मद सलीम असे त्या कॉन्स्टेबलचे नाव असून शुक्रवारी रात्री अतिरेक्यांनी त्याचे अपहरण केले होते. अतिरेक्यांनी मोहम्मद सलीम वर गोळ्या झाडून त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह फेकून दिला होता.
The bullet-riddled body of a #JammuAndKashmir police constable, Mohd Salim, who was abducted by terrorists in Kulgam last night, recovered from Qaimoh Gath area in the district
— ANI (@ANI) July 21, 2018
>सलीम सुट्टीवर जात असताना त्याचे अपहरण केले होते. या अगोदरही ४४ राष्ट्रीय रायफलचा जवान औरंगझेब याचेही अशाचप्रकारे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती.
























































