असं झालं तर…जात प्रमाणपत्र हरवलं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर अर्जदाराचा व वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचा जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा ग्राह्य धरला जातो.

वडिलांचा किंवा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्म उतारा किंवा कुटुंबातील जुना जातीचा दाखला, प्रवर्गानुसार जुन्या काळातील पुरावे महत्त्वाचे ठरतात.

आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल किंवा सातबारा उतारा यांसारख्या कागदपत्रांवर तुमचे नाव आणि पत्ता सुसंगत असल्याची खात्री करा.

आवश्यक स्वयंघोषणापत्र/शपथपत्र आणि अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून भरा. पडताळणीसाठी जाताना मूळ कागदपत्रे सोबत ठेवा.

ऑनलाइन अर्ज करताना स्पष्ट स्कॅन कॉपी अपलोड करा. अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती जपून ठेवा आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा.