
सामना ऑनलाईन । नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकच्या दारणा आणि गंगापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे दारणा धरण ८२ टक्के तर गंगापूर धरण ७९ टक्के भरलं असून या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. नाशिकमधील रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदीरं आणि छोटे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.




























































