
सामना ऑनलाईन, मुंबई
भांडुपच्या श्रीमती रामकली सन्मान सिंह महाविद्यालयात शिकणार्या एका विद्यार्थ्याची आज सकाळी महाविद्यालयाबाहेर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सुशीलकुमार गयाप्रसाद वर्मा (१७) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून एकतर्फी प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचे समजते. सुशीलकुमार हा विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये शिकत होता.


























































