आसाराम बापूच्या भक्तांची तुरुंगाबाहेर गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जोधपूर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या भक्तांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त जोधपूर तुरुंगाबाहेर गर्दी केली आहे. या भक्तांनी तुरुंगाच्या भींतीवर आसाराम बापूचे फोटो लावून त्याची पूजा आरती करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी तुरुंगाबाहेरची व तुरुंगातील सुरक्षा वाढविली आहे.

गुजरात व राजस्थानमधील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात भक्त जोधपूरच्या सेंट्रल तुरुंगाबाहेर जमा झाले आहेत. या भक्तांनी जागोजागी आसाराम बापूंचे फोटो लावले आहेत. तसेच तुरुंगाच्या एका मोठ्या भिंतीवर बापूंचा मोठा फोटो लावून त्याची आरती देखील केली. या भक्तांनी लवकरच त्यांच्या गुरुंवरील सर्व आरोप खोटे ठरून ते बाहेर येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूने १५ ऑगस्ट २०१३ च्या मध्यरात्री जोधपूरजवळील आश्रमात १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी आसाराम बापू याला जोधपूर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

summary : Aasaram bapu devotee gather outside jodhpur jail for gurupournima