पैठणमध्ये मराठा आंदोलन, रस्त्यावर जाळले टायर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पैठण

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलन अद्याप सुरू असून पैठण येथे आज अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर मार्गावर काही आंदोलकांनी टायर पेटवून दिल्यावर आंदोलक निघून गेले. यामुळे दोन्ही बाजूंना अनेक वाहने खोळंबून राहिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.