
सामना प्रतिनिधी, पोलादपूर
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात एक खासगी बस २०० फूट दरीत कोसळून आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून बसमधील प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक बचावले आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३२ कर्मचारी आणि २ चालक-वाहक असे एकूण ३४ जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.
फोटो गॅलरी – पोलादपूर बस अपघातातील मृतदेह पाहून ग्रामस्थ हादरले
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
- सुनील कदम
- निलेश तांबे
- सुयश बाळ
- संदीप झगडे
- प्रशांत भांबेड(ड्रायव्हर)
- राजू रिसबूड
- रत्नाकर पागडे
- प्रमोद जाधव
- संदीप सुर्वे
- प्रमोद शिगवण
- संदीप भोसले
- जयंत चौगुले
- राजेश बंडबे
- संतोष जळगांवकर
- सुनील साठले
- रवीकिरण साळवी
- सचिन झगडे
- संजीव झगडे
- राजाराम गावडे
- पंकज कदम
- सचिन गिम्हवणेकर
- रितेश जाधव
- हेमंत सुर्वे
- राजेश सावंत
- रोशन तबीब
- किशोर चौगुले
- विकास शिंदे
- संदीप सुवरे
- एस. आर. शिंदे
- सावंत(फोंडाघाट रिसर्च स्टेशन)
























































