आरक्षणासाठी धनगर समाज संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

सरकारने पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षणच्या प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन दिले. मात्र गेल्या चार वर्षापासून सरकार कडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे धनगर समाजाचा रोष वाढला आहे. यापार्श्वभूमीवर धनगर समाजाने पुन्हा एकदा आंदोलनचा आणि उपोषणचा पवित्रा घेतला आहे. त्याच अनुषंगाने बुधवारी उत्तर महाराष्ट्र संघटक दत्तात्रय यांचा नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर एसटी आरक्षणसाठी धनगर समाज संघर्ष समितीने लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला एसटी समाविष्ट करून एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती तत्काळ लागू करण्यात याव्यात .मराठा आरक्षणासाठी बोलविलेल्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवसीय उपोषण सुरू आहे. तरी येत्या आठ दिवसा मध्ये धनगर समाजाचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास संपूर्ण जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असा इशारा उत्तर महाराष्ट्र संघटक दत्तात्रय खेमनर जिल्हाअध्यक्ष विठ्ठलराव राऊत यांनी दिला आहे.