स्मिता पाटीलची भाची सिनेमात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे. अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमातून झिल पदार्पण करत असून, या सिनेमात तिचा नायक थ्री इडियटमधील सेंटीमीटर अर्थात दुष्यंत वाघ आहे. झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील राहणारी आहे.

ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात झिल पाटील, सीमा नावाच्या महिला शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेबद्दल झिल सांगते की, छोट्याशा गावात मराठी शाळेत शिकवणारी शिक्षिका मी साकारते आहे. लहान मुलांच्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणारी अशी ही शिक्षिका आहे, शाळेत नव्यानेच आलेल्या प्रशांत गावडे (दुष्यंत वाघ) यांच्या चांगल्या गुणांचा ती आदर करू लागते. सरांच्या वक्तशीरपणा, गुणवत्ता या गोष्टी तिला आवडू लागतात. शाळेत घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे पुढे सर माझ्यासाठी माझ्या आईकडे लग्नाची मागणी घालतात आणि गोष्ट पुढे सरकते.