
सामना प्रतिनिधी । जेजुरी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील युवकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. जेजुरी पोलिसांना शिंदे यांच्या खिशात सुसाईड नोट मिळाली असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तत्काळ मंजूर करावे, अन्यथा ५ ऑगस्ट रोजी नीरा नदीत जलसमाधी घेणार आहे असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील दौंडज खिंडीत आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर जेजुरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दत्तात्रय तुकाराम शिंदे (३४, रा. पिंगोरी, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रेल्वे स्टेशनमास्टर विवेक यादव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय शिंदे यांच्यामागे चार वर्षांचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई, एक अविवाहित भाऊ असा परिवार असून ते घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचे समजते.
मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी खासगी इमारती ताब्यात घ्याव्यात! – मुख्यमंत्री
राज्याच्या प्रत्येक जिह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यासाठी विनावापर इमारती, खासगी इमारती ताब्यात घ्याव्यात व ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वसतिगृहे सुरू करावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जिल्हाधिकाऱयांना आज दिले. राज्यातली जी महाविद्यालये राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना देत नाहीत अशा विद्यार्थ्यांना दोन दिवसांत शिष्यवृत्तीची योजना संबंधित महाविद्यालयांनी लागू करावी, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयात बैठक घेतली. कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
राज्य मागासवर्ग आयोगाची कडक पोलीस बंदोबस्तात बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत नेमण्यात आलेल्या राज्य मागासकर्ग आयोगाच्या बैठकीला आज कडक पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (बार्टी) होत असणाऱया या बैठकीत केगकेगळ्या सहा संस्थांनी राज्यातून संकलित केलेल्या माहितीचे किश्लेषण करण्यात आले. दरम्यान, उद्याही (शनिकारी) आयोगाची बैठक होणार आहे.


























































