आरक्षण मागताय, पण नोकऱ्या कुठे आहेत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठा समाज आरक्षण मागतोय, पण नोकऱया कुठे आहेत, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केला. सरकारी नोकऱयांचे प्रमाणच कमी होत असल्याने मराठय़ांना आरक्षण मिळाले तरी त्याचा फायदा फक्त शिक्षणासाठी होऊ शकतो असे ते म्हणाले.

संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नितीन गडकरी यांना मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून प्रश्न विचारला. त्यावर गडकरी म्हणाले की, रोजगार नसल्याने आलेल्या नैराश्यातून मराठा समाज आरक्षण मागत आहे. जात, धर्म, पंथ, भाषेवर नव्हे, तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे असा केंद्र सरकारचाही मानस आहे असे ते म्हणाले.

नितीन गडकरी यांचा सवाल विरोधकांनी सहकार्य करावे
आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांची मर्यादा घालून दिली आहे. ती वाढवून मराठा आरक्षण द्यायचे असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल आणि विरोधी पक्षांनी सहकार्य केले तरच ते शक्य होऊ शकेल, असे गडकरी म्हणाले.