
सामना प्रतिनिधी, धुळे
भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्या मोटारीवर मराठा आंदोलनावेळी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जणांविरोधात अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासहित आयपीसीच्या कलम ३०७, १४३, १४७, ३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार गावीत यांच्या मोटारीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या मतदारसंघात बंद पाळण्यात आला.

























































