
सामना ऑनलाईन । मुंबई
बाहुबलीच्या चाहत्यांना महिश्मतीच्या साम्राज्याला भेट देण्याची आणि शिवगामीचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. नेटफ्लिक्सवर ‘बाहुबली-बीफोर द बिगिनिंग’ ही बेवसीरिज सुरू होणार असून त्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला आहे. हा ट्रेलरवर नेटकऱ्यांनी प्रचंड उड्या घेत बाहुबलीची क्रेझ कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.
You witnessed the Mahishmati Empire in all its glory. Now witness its rise. Baahubali: Before the Beginning coming soon. pic.twitter.com/csPODOcXdt
— Netflix India (@NetflixIndia) August 2, 2018
आनंद निलकांता यांच्या ‘द राईज ऑफ शिवगामी’ या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज लवकरच नेटकऱ्यांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स आणि बाहुबली चित्रपटाच्या टीमने एकत्र येऊन वेबसीरिजची निर्मिती केली आहे. अर्क मीडिया वर्क आणि राजमौली यांचाही समावेश आहे. देवा कट्टा आणि प्रवीण सतारु हे सहदिग्दर्शक आहेत. बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली यांनी भव्यदिव्य, खिळवून ठेवणारी मालिका तयार होत असल्याचे माहिती दिली. परिपूर्ण असे हिंदुस्थानी महाकाव्य जगभरात पोचेल, असा विश्वास व्यक्त केला.




























































