चेंबूरच्या आगीत वृद्धेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन, मुंबई

चेंबूरच्या टिळकनगरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका ८४ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. लीला नायर असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे.  चेंबूर पश्चिम येथील सहकार टॉकीजजकळ अमरदीप ही आठ मजली इमारत आहे. या इमारतीच्या बी विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील रूम न. २०१ मध्ये  नायर कुटुंबीय राहते. त्यांच्या घरात दुपारनंतर गॅस सिलिंडरमधून  गॅसची गळती सुरू झाली. मात्र हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. या घरातील वृद्धा लीला नायर यांनी पावणेचारच्या सुमारास गॅस पेटवला असता अचानक भडका उडून तेथे आग लागली. यामध्ये त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. यावेळी त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.