मराठा आरक्षण : मेहकरात शिवसेना आमदाराचे मुंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप जोशी । मेहकर

मेहकरात शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी गुरुवारी मुंडन करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

जिजाऊ चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित जमले असताना शिवसेना आमदार संजय रायमुलकर तसेच बाजार समिती सभापती माधवराव जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर हे त्या ठिकाणी पोहोचले. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला तसेच पाठिंबा म्हणून आमदार संजय रायमुलकर व तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर यांनी मुंडन केले यासोबतच काँग्रेसचे नगराध्यक्ष कासमभाई गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निसार अंसारी यांनीसुद्धा मुंडन करून पाठिंबा दिला.