
सामना ऑनलाईन । मुंबई
दि ब्लाइंड वेलफेअर ऑरगनाझेशनच्या वतीने शनिवारी, ११ ऑगस्ट २०१८ रोजी प्रज्ञाचक्षुंना ज्ञान व्हावे यासाठी ब्रेल ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संत मुक्ताबाई एका अभंगात म्हटले होते- ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ खऱ्या अर्थाने प्रज्ञाचक्षु बांधव आजपर्यंत धर्मग्रंथांच्या ज्ञानापासून वंचित होते. त्या दि ब्लाइंड वेलफेअर ऑरगनाझेशनच्या वतीने त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये ज्ञानेश्वरीचा ग्रंथ छापला आहे. यामुळे आता या बांधवांना देखील माऊली ज्ञानेश्वरांच्या विचारांचा अमृतानुभाव घेता येईल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवसेना भवन, दादर येथे सकाळी ११:३० वाजता संपन्न होणार आहे.























































