टीम इंडियाच्या नाश्त्यात बीफ पास्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लंडनमध्ये दोन्ही कसोटीत पराभवाचा सामना करणाऱ्या टीम इंडियावर चाहते नाराज आहेत. या पराभवानंतर आता चाहत्यांचा रोष आणखी उफाळण्याची शक्यता आहे. कारण, लंडनमध्ये टीम इंडियाच्या नाश्त्यात बीफ पास्ता असल्याचं समोर आलं आहे.

लॉर्डस येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बीसीसीआयने टीम इंडियाच्या नाश्त्याचा मेन्यू ट्वीट केला. त्यात ब्रेज्ड बीफ पास्ता असा खाद्यपदार्थही देण्यात आला आहे. या फोटोवरून ट्विटरवर नेटकऱ्यांनी बीसीसीआयला चांगलंच धारेवर धरलं आहे. हिंदुस्थानात गायीला असणारं धार्मिक महत्त्व आणि त्यामुळेच गोमांस सेवनाला घालण्यात आलेली बंदी झुगारून बीसीसीआयने नाश्त्यात बीफ दिल्याबद्दल नेटकरी संतापले आहेत. टीम इंडियातील बहुतांश खेळाडू हे हिंदू आहेत आणि तरीही ते गोमांसाचं सेवन करत आहेत, हे पाहून टीम इंडियाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.