मोठी बातमी : उमर खालीदवर गोळीबाराचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उमर खालीद याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबाराचा प्रयत्न केला. या हल्ल्यात उमर खालीद थोडक्यात बचावला आहे. कॉन्स्टिट्यूशनल क्लब येथे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लब येथे दोन अज्ञातांनी उमर खालीदवर गोळीबाराचा प्रयत्न केला. उमर खालीद आणि त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्तींनी त्यांच्यासोबत येथे बोलण्याचा प्रयत्न केला. यापैकी एकाजवळ पिस्तूल होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ येथे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले असून अज्ञात हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध सुरू आहे.

उमर खालीदवरील हल्ल्याच्या प्रयत्नावर पोलिसांचे काय आहे म्हणणे –

 

summary : jnu student umar khalid fired at in delhi