‘अनन्या’ला मिळाली अनोखी दाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नाटकाला प्रेक्षक मिळत नाहीत अशी एकीकडे ओरड असताना आजही नाटकावर मनापासून प्रेम करणारे अनेक दर्दी पेक्षक आहेत. याचाच प्रत्यय रविवारी शिवाजी मंदिरातील ‘अनन्या’ नाटकाच्या प्रयोगावेळी आला. या नाटकातील ऋतुजाचा अभिनय पाहून भारावून गेलेल्या एका प्रेक्षकाने चक्क तिला 51 हजारांचे बक्षीस दिले आहे.

‘अनन्या’ या नाटकात एका तरुणीने आपल्या शारीरिक उणिवेवर मात करून जगण्याच्या केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. यात ऋतुजा मुख्य भूमिकेत आहे. रविवारी शिवाजी मंदिरमधील प्रयोगानंतर एका चाहत्याने तब्बल 51 हजारांचे बक्षीस देत तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. याबाबत सोशल मीडियावरून ऋतुजाने त्या चाहत्याचे आभार मानले आहेत. आपला आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, ‘‘आयुष्यातला हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. हे कौतुक मला माझ्यावर अभिनेत्री म्हणून असलेल्या जबाबदारीची नेहमीच जाणीव करून देत राहील. यातील काही रक्कम मी दिव्यांगांसाठी काम करणाऱया संस्थेला देऊ इच्छिते.’’

पुन्हा कचऱयाच्या लाटा

अरबी समुद्रात सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ऑगस्ट महिन्यातली सर्वात मोठी भरती आली. तब्बल 4.96 मीटरपेक्षा उंच लाटा उसळल्यामुळे नरीमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, मरीन लाइन्ससह विविध चौपाटय़ांच्या किनारपट्टीवर शेकडो टन कचरा जमा झाला. हा कचरा साफ करण्यासाठी पालिकेचे शेकडो सफाई कामगार तैनात होते.