दिशाभूल करू नका!मराठा समाजाचे मुख्यमंत्री, गृह विभागाला निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठा आरक्षणाचा निर्णय नोव्हेंबरअखेरपर्यंत घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आंदोलने स्थगित झाली. मात्र आंदोलकांवरील गुन्हे अद्यापही मागे न घेतल्याने समाजामध्ये असंतोष आहे. अद्यापही समाजामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. मराठा समाजाची दिशाभूल करू नये. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत असे निवेदन मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज मुख्यमंत्री कार्यालय तसेच गृह विभागाला देण्यात आले.

गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू – दीपक केसरकर

मराठा आंदोकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाएकी गुन्हे मागे घेता येत नाहीत. गंभीर गुन्हे सोडून अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया कराकी लागते, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.