
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहरातील गुळ मार्केट चौकाजवळील व्यंकटेश सिरॅमिक हे मुख्य रस्त्यावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातील सोन्याचे दागीने, सोन्याचे बिस्कीट, कॉईन, रोख रक्कम असा सुमारे 6 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पळवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर द्वारकादास मालू यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांचे व्यंकटेश सिरॅमिक हे मुख्य रस्त्यावरील दुकान बंद करुन ते घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडले. बाजूच्या बिल्डींग वरील पायऱ्याच्या टॉवरवरुन चोरटे आत शिरले होते. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील ईलीव्हेशनचे काच फोडून ते दुकानात आले. दुकानातील ड्रॉव्हर फोडला आणि त्यामधील सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्कीट, कॉईन, आणि रोख रक्कम असा सुमारे 6 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पळवण्यात आला.





























































