पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक विजेती वैभवी पाटकरची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अलिबाग

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग सुवर्ण पदक विजेती युवती वैभवी पाटेकर (19) हिने आत्महत्या केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैभवीने आपल्या करियरमधून पुढे जाण्याची संधी न मिळाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे.

वैभवी पाटेकर ही सोमवार पासून घरातून बेपत्ता झाली होती. पालकांनी वैभवीचा सगळीकडे शोध घेतला मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. परंतु मंगळवारी रात्री वैभवी हीचा मृतदेह गोरेगाव मधील विष्णू तलावात सापडला. त्यानंतर वैभवी हिने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

वैभवी ही आपले पदवीचे शिक्षण घेत होती. तिला लहानपणापासून पॉवर लिफ्टिंगची आवड असल्याने या खेळात करियर करण्याचे ठरवले होते. वैभवीची आई ज्योतिक पाटेकर ही सुद्धा पॉवर लिफ्टिंग मधील सुवर्ण पुरस्कार विजेते आहे. आईचा आदर्श घेऊन या मायलेकिनी रायगडची मान उंचावली आहे. दोघीही मायलेकिनी पॉवर लिफ्टिंगमध्ये तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर उत्तम कामगिरी केली होती. राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तिला सुवर्ण पदक मिळाले होते. वैभवीच्या तिच्या यशाने तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही ती पॉवर लिफ्टिंग सारख्या खेळात वैभवीने प्राविण्य मिळविले होते.

परिस्थितीशी लढा
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राहणाऱ्या 49 वर्षीय ज्योतिका पाटेकर या लोणेरे येथील आंबेडकर विद्यापिठा जवळील वाय पॉईन्ट येथे दाबेलीची गाडी चालवून आपला व मुलांचा चरीतार्थ चालवित आहेत. आपला व्यवसाय सांभाळून या मायलेकिनी आर्थिक परिस्थिती असतानाही पॉवर लिफ्टिंग सारख्या खेळात प्राविण्य मिळविले होते.

वैभवीला पॉवर लिफ्टिंग मध्ये आपले करियर करायचे होते. मात्र परिस्थितीमुळे तिला संधी मिळत नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात गेली होती. या नैराश्यातून तिने आपला जीव देऊन जीवनयात्रा संपवली आहे. वैभवीच्या आत्महत्येबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.