शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त परळीत अलोट गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैद्यनाथ

 देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी गर्दी होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. दिवसभर दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक झाले. कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली होती. तसेच याठिकाणी पोलिसांनी ही मोठा बंदोबस्त तैनात केला.

मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. मोठ्या संख्येने भाविक होणार दाखल होणे अपेक्षित धरूनश्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने शंभराहून अधिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर नजर ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शन साधारणपणे दीड लाख भाविक भक्तांनी दर्शन घेतल्याचे वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.

वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेलाची मोठी विक्री झाली.केवळ बेल-फुलांवर हजरोंची उलाढाल झाली.हर हर महादेव, बम बम बोले, वैद्यनाथ महाराज की जय, ओम नमो शिवाय या जयघोषाने भक्तांनी परिसर दणाणून सोडला होता.भाविकांच्या मांदियाळीने परळी वैद्यनाथ नगरी फुलून गेली होती. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथ मंदिरात लाखो भाविक आल्याने परळीला यात्रेचे स्वरुप आले होते. दिवसभरात परळी पंचक्रोशीतील भाविकांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात सह मराठवाड्यातील एक लाखाहून अधिक भाविक प्रभू वैद्यनाथ चरणी नतमस्तक झाले.