2007 हैदराबाद दुहेरी स्फोट प्रकरण: अनिक सैयद, मोहम्मद अकबर दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबाद येथे झालेल्या दोन बॉम्ब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवलं आहे. मंगळवारी आपला फैसला सुनावताना अनिक शफीक सैयद आणि मोहम्मद अकबर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर अन्य तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हैदराबाद येथील गोकुळ चाट भांडार येथे एक तर दुसरा बॉम्ब स्फोट लुम्बिनी पार्क येथे झाला होता. या स्फोटांमध्ये 42 जणांचा मृत्युमुखी पडले होते. तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते.

summary: 2007 Hyderabad Twin Blasts case, Aneeq Shafeeq Sayeed and Ismail Chaudhary convicted