
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात हिंदुस्तानच्या जवानांना यश आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील चौलगाम परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली असून सध्या शोधमोहीम सुरू आहे. ठार केलेले दहशतवादी लष्कर – ए – तोयबाचे असल्याची माहिती पुढे येत असून आणखी काही दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध सुरू आहे. एका घरामध्ये काही दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळताच हा परिसर घेरण्यात आला आसून आत्तापर्यंत पाच जणांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती कश्मीरते पोलीस महानिरिक्षक एस.पी. पानी यांनी दिली आहे्.
#UPDATE: Total five terrorists have been killed so far, search operation underway: IGP Kashmir SP Pani on Kulgam encounter https://t.co/CbDRwuU3cL
— ANI (@ANI) September 15, 2018
Encounter between terrorists & security forces is underway in Kulgam’s Chowgam. 3 terrorists have been killed so far. Train services between Baramulla-Qazigund have been suspended: #JammuAndKashmir Police (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/FKpU426GVd
— ANI (@ANI) September 15, 2018
दरम्यान, दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर बारामुल्ला आणि काझीगंद दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. हिंदुस्तानी सैन्याचे जवान आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

























































