राफेल खेरदी घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा २५ सप्टेंबरला मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अशोक चव्हाण - 1) 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009, 2) 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी । नांदेड

भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने राफेल हेलिकॉप्टर खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत देशाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या खरेदीतही भाजपने देशाला फसविले आहे. या घोटाळ्याच्या विरोधात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २५ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी दिली.

नांदेड शहरासह संपूर्ण तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात राजूरकर यांनी घेतली. त्यांनी राफेल खेरदी घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्या मोर्चाच्या नियोजनामागील भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २५ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महात्मा फुले पुतळा आयटीआय येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या मोर्चास ५० हजारांपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, मागासवर्गीय सेल, मच्छीमार सेल, एनएसयुआय यांचाही या मोर्चामध्ये मोठा सहभाग राहणार असून आजच्या बैठकीत राजूरकर यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.