आदिवासींच्या पैशांकर ठेकेदार-अधिकाऱ्यांचा डल्ला, 26 कोटी लाटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किक्रमगड

आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी शासनाने दिलेला निधी विकासकामांवर खर्च न करता अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विक्रमगड तालुक्यातील 304 कामांसाठी शासनाने 30 कोटींचा निधी दिला. मात्र यातील फक्त 42 कामे झालेली आहेत. उर्वरित कामे न करता ती कागदोपत्री दाखकण्याचा प्रताप अधिकारी आणि ठेकेदारांनी करून तब्बल 26 कोटी रुपये लाटले आहेत.

किक्रमगड या आदिवासी तालुक्यांतील गावांचा विकास व्हावा, यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेमधून 2012 पासून 2015 या तीन वर्षांत ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना राबवण्यात आली. या योजनेमधून तालुक्यातील एकूण 94 गाकवांपैकी 83 गावांमध्ये 304 विकास कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने 30 कोटींचा निधी दिला गेला. मात्र गावांचा विकास बाजूलाच राहिला. अधिकारी व ठेकेदार यांनी 26 कोटी रुपये संगनमताने हडप केले. मुंबई आयआयटीच्या 1175 पानांच्या अहवालामध्ये धक्कादायक निष्कर्ष नोंदकले गेले आहेत. 304 कामांपैकी एक काम प्रत्यक्षात सुरूच झालेले नाही. 108 कामे प्रत्यक्षात साईटकर मिळाली नाहीत, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

विक्रमगड तालुक्यातील कामाचे ऑडिट आयआयटीमार्फत झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आमच्याकडे 105 कामांचा अहकाल मिळाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या अहकालाची चौकशी सुरू आहे. जर या कामामध्ये चुकीची कामे किंवा गैरव्यवहार झालेला असेल तर कारवाईसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना अहवाल पाठकला जाईल.
– अजित कुंभार,
(प्रकल्प अधिकारी, आदिकासी विकास प्रकल्प जव्हार).