
सामना ऑनलाईन, राहुरी
21 आणि 22 सप्टेंबर या दोन दिवसांत नगर जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही बातमी खरी ठरली तर ती इथल्या शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता असेल. हा पाऊस झाला तर इथले मुळा धरण ओसंडून वाहायला लागेल अशी शक्यता आहे.
राहुरी तालुक्यात गेल्या साडेतीन महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. आता शेतकऱ्यांच्या आशा परतीच्या पावसावर आहेत. त्यामुळे हा पाऊस पडावा अशी इले शेतकरी प्रार्थना करत आहेत. मुळा धरणातील पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाऊस गेल्यानंतर जीवनदान देणारं ठरतं. गेल्या वर्षी हे धऱण ओव्हरफ्लो झालं होतं, मात्र गेल्या दोन महिन्यापासून घाटमाथ्यावर पाऊस होत नसल्याने धरणातील पाण्याची आवक जवळपास बंद झाली होती. हे धरण 75 टक्के भरले असून २ दिवसांत खरोखर चांगला पाऊस पडला तर हे धरण यंदाही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.



























































