
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सचं दिवाळं निघालं आहे. सेन्सेक्स तब्बल एक हजार अंकांनी पडल्याने हाहाकार उडाला आहे. जागतिक बाजारात सर्वत्र पडझड दिसत असून त्याचे परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झालेले आहेत. शेअर बाजारात अचानक विक्रीचं प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
येस बँक, इंडियाबुल्स हाऊसिंग, यूपीएल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, सन फार्मा आणि टाटा स्टीलचे शेअर्स आज मजबूत पडले आहेत. एकीकडे हा हाहाकार माजलेला असताना भारती इंफ्राटेल, आईओसी, एनटीपीसी, आईटीसी, बीपीसीएल, रिलायंस इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय यांचे शेअर्स तेजीत निघाल्याने हे समभागध ज्यांच्याकडे आहे त्या समभागधारकांमध्ये जबरदस्त आनंद निर्माण झाला आहे.























































