
सामना ऑनलाईन । मुंबई
भजन सम्राट अनुप जलोटा आपल्या ३७ वर्षाहून लहान असलेली प्रेयसी जसलीनमुळे चर्चेत आले होते. एका मॉडेलने त्यांच्यावर गंभीर आरोप करून जलोटा अडचणीत येऊ शकतात. मॉडेलने अनुप जलोटा यांच्यावर मारहाण आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
अनीशा सिंह या मॉडेलने अनुप जलोटा यांच्यावर शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे तसेच बिग बॉसमध्ये एन्ट्री देण्याचेही वचन जलोटा यांनी दिले होते असे या मॉडेलने सांगितले. गेल्या सहा महिन्यात दोन वेळा जलोटांनी आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवले असून लग्नाचे वचन दिल्याचे मॉडलने सांगितले.
इंडिया स्कूपला माहिती देताना अनीशा म्हणाली की “जलोटा यांनी मला बिग बॉसच्या १२ व्या पर्वात नेण्याचे वचन दिले होते. गेल्या सहा महिन्यात आमचे दोनदा शारिरीक संबंध झाले होते. मला त्यांच्यासोबत असलेल्या या संबंधांबाबत कुठलीच तक्रार नाही कारण त्यांनी मला प्रपोज केले होते आणि लग्नाचे वचनही दिले होते.”
पण त्यानंतर जलोटा यांनी आपले फोन उचलण्यास बंद केले. त्यांनी अनीशाला टाळण्यास सुरूवात केली. जलोटा यांना बिग बॉसमध्ये प्रवेश मिळाला नसेल अशी शंका अनीशाला वाटली. पण जेव्हा टी.व्हीवर अनीशाने बिग बॉसमध्ये जसलीनसोबत जलोटांना पाहिले तेव्हा ती अचंबित झाल्याचे तिने सांगितले.




























































