
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील एका मुलाचा जीव फक्त देवकृपेने वाचला. एका महिलेने त्याच्या अंगावरून गाडी घातली आणि त्याला चिरडत वेगात निघून गेली. या महिलेच्या गाडीचा एक दरवाजाही उघडा होता. मुलाच्या अंगावरून गाडी जात असताना हा दरवाजा उघडला होता, तरीही या महिलेला काहीतरी गडबड झालीय याची जाणीव झाली नाही.
गाडी चालवताना अचानक काही अडथळा आला किंवा गाडी पुढे अपेक्षित वेगाने जात नसेल तर चालक गाडीखाली काय आलंय, हे थांबून बघत असतो. मात्र या महिलेला आपल्या गाडीखाली काहीतरी आलंय हे कळलंच नाही. अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या या महिलेला गाडीचा दरवाजा उघडा आहे हे देखील न कळणे हे देखील अत्यंत धोकादायक आहे. गाडीत बसत असताना या महिलेला माहीत होतं की मुलं खेळताहेत.अशा परिस्थितीत कोणताही चालक पाठीपुढे पाहून गाडी हळूहळू बाहेर काढतात. हा मुलगा नेमका गाडीसमोरच बुटाची लेस बांधत होता. गाडीपुढे काही आहे का हे बघूनच चालक गाडी पुढे न्यायला सुरुवात करतात. यातलं या महिलेने काहीही न करता गाडी सुरू करून मुलाला चिरडून सुसाट निघून गेली.
























































