आईसोबत शौचाला गेलेल्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात बिबट्याने 8 वर्षांच्या मुलाला ठार मारलं आहे. मुरपार येथे आईसोबत शौचास गेलेला असताना साहिलवर बिबट्याने झडप घातली आणि त्याला जंगलात ओढत नेले. यानंतर त्याच्या आईने आरडाओरडा करत गावकऱ्यांना बोलावलं. गावकऱ्यांनी साहिलचा ताबडतोब शोध घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत बिबट्याने साहिलचा जीव घेतला होता.