कर्जत – भाजपची पाटी कोरी, दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून बारा पैके दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. सात ठिकाणी राष्ट्रवादी, दोन ठिकाणी शेकाप आणि एक ठिकाणी काँग्रेस सरपंच निवडून आले आहेत. भाजपाची मात्र पाटी कोरी राहिली आहे.

बारा पैकी कशेळे ग्रामपंचायती मध्ये सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड झाली. याबरोबर बीड बुद्रुक सरपंच देखील बिनविरोध निवडण्यात आला. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये मात्र चुरशीची लढत पहायला मिळाली. माणगाव या ग्रामपंचातीमध्ये अवघ्या 15 मतांनी शिवसेनेच्या कल्याणी कराळे या विजयी झाल्या. त्यांना 1049 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कराळे यांना 1034 मते मिळाली. बारा पैकी सात ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले आहेत, यापैकी दोन जणांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे दोन सरपंच विजयी झाले आहेत तर काँग्रेस चा एक सरपंच विजयी झाला आहे.

विजयी सरपंच
1)मानिवली -प्रवीण पाटील -शेकाप
2)वारे- योगेश राणे -शेकाप
3)माणगाव तर्फे वरेडी -कल्याणी कराळे -शिवसेना
4)पाषाने भास्कर दरवडा -शिवसेना
5)शेलू- शिवाजी खारीक- काँग्रेस
6)बोरिवली- वृषाली क्षीरसागर- राष्ट्रवादी काँग्रेस
7)मोग्रज – रेखा देशमुख- राष्ट्रवादी काँग्रेस
8)आसल-रमेश लदगे- राष्ट्रवादी काँग्रेस
9)पिंपलोळी- चंद्रकांत निरगुडा- राष्ट्रवादी काँग्रेस
10)सावळा-हेदवली- सुनंदा गायकर-राष्ट्रवादी काँग्रेस
11(कशेळे- बिनविरोध- राष्ट्रवादी काँग्रेस
12)बीड बुद्रुक- बिनविरोध-राष्ट्रवादी काँग्रेस