राजधानी पणजीत उद्या पासून कडक प्लास्टिक बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

राजधानी पणजी शहरात उद्या पासून महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकबंदी लागू होत आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ कापडी, कागदी व काथ्याच्या पिशव्या वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

उद्यापासून शहरात प्लास्टिकबंदी लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जागृतीसाठी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी यांनी आज सकाळपासून घरोघर तसेच व्यावसायिक आस्थापनांना भेट देण्यास सुरुवात केली. नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये घराघरात भेट देत असून कापडी तसेच काथ्याच्या अथवा कागदी पिशव्या मोफत वाटत आहेत.

प्लास्टिकबंदीबाबत महानगरपालिका ठाम आहे. महानगरपालिकेची बैठक गुरुवारी होऊन येत्या २ ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिकबंदी पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत.