सामना ऑनलाईन, रत्नागिरी
चिपळूण ते खेड असा प्रवास करत असताना प्रवाशाच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमंतीची सोन्याची चेन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. विलास शंकर साळवी (वय ४८) रा. पेवे, गुहागर हे चिपळूण ते खेड दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांने लंपास केली. बस पिरलोटे गावाजवळ आली असता आपल्या गळ्यात सोन्याची चेन नसल्याचे विलास साळवी यांच्या लक्षात आले.या चोरीची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.चेन चोरीची आणखी एक घटना चिपळूण मध्ये घडली आहे.एका वयोवृध्दाच्या गळ्यातील सोनियाची चेन अज्ञात इसमाने लंपास केली.वसंत गुणाजी जाधव (वय ६७) रा. टेरव,चिपळूण यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाची ७२ हजार ३३७ रुपये किमंतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.या चोरीचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.



























































