रवि शास्त्री व कोहलीसमोर निवड समितीचे काही चालत नाही !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
virat-kohli-ravi-shastri-test

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या हिंदुस्थानच्या संघावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. आता या वादात माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी प्रमुख सय्यद किरमानी यांनी उडी घेतली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील ‘सध्याच्या निवड समितीकडे इतका अनुभव नाही ते प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतील. यामुळे रवि सास्त्री हे प्रशिक्षक आणि खेळाडूंची निवड करणारे अशा दोन्ही भूमिकेत दिसत आहेत’, असे वक्तव्य सय्यद किरमानी यांनी केले आहे.

#INDvWI वन डे व टी-20 मालिकेपूर्वी मोठा धक्का, स्फोटक फलंदाज बाहेर

कसोटी मालिकेसाठी करुण नायर, रोहित शर्मा, मुरली विजय यांची निवड केल्याने वाद निर्माण झाला. अनेक माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत बीसीसीआय आणि निवड समितीवर याचे खापर फोडले होते. यानंतर पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने बीसीसीआयचा बचाव केला होता. दरम्यान, या प्रकरणी किरमानी यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, ‘जर मला विचारले तर रवि शास्त्री हेच मुख्य निवडकर्ते आहेत. ते कर्णधार आणि वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करतात आणि त्यांना हवा तो प्रस्ताव निवड समितीपुढे ठेवतात. अनुभवाची कमतरता असणाऱ्या निवड समितीला त्याला आव्हानही देता येत नाही.’