
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या चंद्रपूर प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी सहाव्या पर्वाच्या खेळाडुंचा लिलाव आज शहरात पार पडला. सीपीएल आयोजन समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना खेळण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. आगामी सिजन -6 येत्या 20 डिसेंबर 2018 ते 6 जानेवारी 2019 पर्यंत आहे. आज शहरातील नामांकित हॉटेल मधे त्या खेळाडूंचा लिलाव करण्यात आले, यावेळी 16 टीमच्या मालकांसह सहकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये आणि द्वितीय पारीतोषिक ६१ हजार रूपयांचे आहे. याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेही यात देण्यात येतात.
स्पर्धा निकोप व्हावी, यासाठी बाहेर राज्यातील क्रिकेट असोसिएशनचे पंच बोलावण्यात येतात. आजच्या लिलाव कार्यक्रमात यंदाच्या पर्वाचे प्रमोशनल गाणे देखील जारी केले गेले. प्रारंभ कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. कांबळे यांची उपस्थिती होती.






























































