
सामना ऑनलाईन । मुंबई
कलाकारांचे काम सांभाळणारी संस्था क्वानचा सहसंस्थापक अनिर्बन ब्लाहने वाशी पुलावर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत अनिर्बनचे प्राण वाचवले. अनिर्बनवर #metoo अंतर्गत महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना कंटाळून हे पाऊल उचल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.
अनिर्बन ब्लाह याने आपल्या मित्रांसोबत क्वान ही कलाकारांची काम सांभाळणारी संस्था स्थापन केली होती. #metoo मोहीमेत अनिर्बन वर अनेक महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अनिर्बनला त्याच्या पदावरून काढण्यात आले होते. ऑफिसच्या महिला कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिर्बनला कामावरून काढण्यात आले नव्हते. तर काही काळासाठी त्याला या पदावरून दूर ठेवण्यात आले होते.
#Maharashtra: According to Sr PI Vashi Traffic, Anirban Blah, the co-founder of Kwan Entertainment tried to commit suicide at Vashi old bridge at around 12:30 am today. He tried to commit suicide as he was in depression due to #MeToo allegations against him.
— ANI (@ANI) October 19, 2018
वाशी वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक तरुण बॅरिगेट वरून उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होता. हा तरुण आत्महत्या करण्यासाठीच हे कृत्य करत असल्याचा संशय पोलिसांना आला आणि वेळीच त्याला पकडले. अनिर्बनला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला पाणी पाजले. तो कमालीचा नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. अनिर्बनला आत्महत्येचे कारण विचारल्यास #metoo मध्ये त्याच्यावर जे आरोप झाले त्यामुळे आपल्याला खूप त्रास सहना करावा लागाला, आपल्या कुटुंबीयांची बदनामी झाल्याचे त्याने सांगितले. म्हणून आपण आत्महत्येचा मार्ग स्विकारल्याचे त्याने कबुल केले.
अनिर्बन सह आठ जणांनी क्वान या कंपनीची स्थापना केली होती. चार महिलांनी अनिर्बनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर अनिर्बनला कंपनीच्या पदावरून हटवण्यात आले होते. अनिर्बनवर पोलिसांत कुठलाच गुन्हा दाखल नाही.






























































